कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापुरी चपलेने लढू नका- चंद्रकांत पाटील
पुणे: किरीट सोमय्या यांच्याकडून माझ्यावर करण्यात येणाऱ्या आरोपा मागील मास्टर माईंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच आहेत असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे त्यांच्या या आरोपाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले असून राज्याने दंडुकेशाही, मोगलाई, म्हणजे काय हे काल पाहिलं .मला हसन मुश्रीफ यांना सांगायचंय पॅनिक होऊन काही होत नसत .कायद्याची लढाई कायद्याने लढा, कोल्हापुरी चपलेने लढू नका
असा टोला चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांना लगावला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, बरेच दिवसापासून भाजपचे आमदार शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे त्यावर पण त्यांनी भाष्य केले .सोलापूर मध्ये आमचे 2 आमदार होते आता 8 आमदार झाले. त्यामुळे जे काही लोक आमचे आमदार फुटून शिवसेनेत जातील ते बंद करावे असा ही टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसैनिकांना लगावला. जर हॅम मध्ये घोटाळा होता तर इतके महिने झोपला होता का ? या सरकारला पैसे खण्याशिवाय काही कळत नाही. अशीही टीका त्यांनी केली.
ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे आज-काल बाहेर यायला लागले आहेत. त्यावर पण त्यानी भाष्य केले ठाकरे सरकारला कोर्टाकडून फटके खायची सवय लागली आहे .तुम्ही ईडी ला उत्तर द्या 98 कोटी च्या फेक एन्ट्री कुठून आल्या. शरद पवार अश्या गोष्टींना पाठींबा देणार नाही असे बोलून हसन मुश्रीफ यांना चंद्रकांत पाटील यांनी खडसावले. हे बे भरवशी सरकार आहे एक वेळ अशी येईल या सरकारवर त्यांना पृथ्वी तलावर पाळायला जागा मिळणार नाही. असे बोलून चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला. बरेच दिवसापासून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना भाजपची ऑफर आहे अशी चर्चा होती त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले मुश्रीफ याना भाजपची ऑफर नव्हती.असे ही पाटील म्हणाले,
