Wednesday, November 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

सोनी मराठी वर नवी मालिका ‘ज्ञानेश्वर माउली’

पुणे : महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अवलंबल्या  जात असलेल्या भक्ती संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानदेव ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकाना पाहायला मिळणार आहे.

‘ज्ञनेश्वर माउली‘ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा या मालिकेतून उलगडणार आहे.

भगवतगीतेतील विचार सर्व सामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. दिगपाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी या मालिकेची निर्मती केली असून दिगपाल या मालिकेचं दिग्दर्शनही  करणार आहेत. चिन्मय  आणि दिगपाल यांनी आत्तापर्यंत अनेक ऐतिहसिक कलाकृती घडवल्या आहेत. हे दोघंही एखादी कलाकृती अतिशय अभ्यासपूर्वक प्रेक्षकांसमोर आणतात.

या मालिकेसाठी ज्ञानेश्वर माउलींच्या रचना, ओव्या संगीतबद्ध केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकांना एक सुरेल अनुभवही मीळणार आहे. ज्ञानेश्वर माउलींच  या चरित्रगाथेतील  चमत्कार ग्राफिक्सद्वारे चित्रित होणार आहे. ज्ञानेश्वर माउलींच्या या चरित्रगाथेतून  दिव्यत्वाचं दर्शन अनभवायला मिळणार आहे.

 

Leave a Reply