मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात जगदाळे हेल्थकेयरच्या मलमीनाचे योगदान
पुणे : जगदाळे इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचा एक विभाग असलेल्या जगदाळे हेल्थकेयरने आपले लोकप्रिय, आरोग्यदायी पेय मलमीना®बाबतच्या क्लिनिकल संशोधनाच्या निष्कर्षांची घोषणा नुकतीच केली. हे पेय मुलांसहित सर्व वयोगटातील व्यक्तींना पिण्यासाठी योग्य आहे. मलमीना® नैसर्गिक सुपरफूड्सनी बनलेले असून हे टेट्रा पॅकमध्ये उपलब्ध असणारे, थेट प्यायले जाऊ शकते असे, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे, अँटी-ऑक्सिडंट असे एकमेव पेय आहे. संशोधनातून या पेयाची रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या अंतर्भूत गुणवैशिष्ट्ये सिद्ध झाल्यामुळे इतर आरोग्य पेयांपेक्षा हा जास्त चांगला पर्याय आहे.
सध्या सुरु असलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लोक निवारक आरोग्यासाठी जास्तीत जास्त चांगले उपाय स्वीकारू पाहत आहेत. जागतिक पातळीवर कोविडच्या केसेसमध्ये वाढ होत असल्याने जगभरातील हेल्थकेयर कंपन्या या रोगावर व्यवहार्य, प्रतिबंधात्मक आणि गुणकारी पर्याय शोधत आहेत.
एका नामांकित वैद्यकीय संस्था व संशोधन केंद्रात करण्यात आलेल्या क्लिनिकल संशोधनात श्वसनमार्गातील संसर्गाने आजारी मुलांवर मानक उपचारांबरोबरीनेच मलमीना मँगो (आंबा, गोटू कोला/सेन्टेला एशियाटिका आणि हळद यांचे मिश्रण) देखील प्यायला दिल्याने १४ आणि २८ दिवसांत अँटी-ऑक्सिडंट चिन्हके व रोगप्रतिकार शक्ती चिन्हके यांच्यात लक्षणीय वाढ आढळून आली. याबरोबरीनेच सी-रिएक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) सारखे दाहक चिन्हक कमी केल्याचे आणि एकूण अँटी-ऑक्सिडंट क्षमता वाढल्याचे देखील सिद्ध झाले आहे.
बंगलोरच्या मल्लिगे हॉस्पिटलच्या कन्सल्टन्ट पेडियाट्रिशियन डॉ. सौम्या नागराजन म्हणाल्या की या अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, श्वसनमार्गामध्ये संसर्ग झालेल्या निवडक रुग्णांमध्ये जेव्हा आंबा, गोटू कोला आणि हळद व आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे यांचे मिश्रण जेव्हा प्रतिजैविकांसोबत वापरले गेले तेव्हा रोगप्रतिकार शक्ती आणि अँटीऑक्सिडंटच्या पातळीत वाढ झाली, नियमितपणे करण्यात आलेल्या रक्त विश्लेषणातून हे सिद्ध झाले आहे. थेरपीच्या बरोबरीने न्यूट्रस्युटिकल उत्पादने कशी काम करू शकतात यासंबंधीच्या अभ्यासाला यामुळे दिशा मिळेल.
जगदाळे इंडस्ट्रीज, भारत चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश जगदाळे म्हणाले कीवैज्ञानिकदृष्ट्या संशोधित, जागतिक दर्जाची उत्पादने पुरवण्यावर आमचा विश्वास आहे, ही उत्पादने क्लिनिकली सिद्ध झालेली आणि लोकांच्या सर्वसामान्य जीवनशैलीनुसार सहजासहजी अनुकूलित असली पाहिजेत. खरे ज्ञान सर्वांच्या फायद्यासाठी वाटले गेले पाहिजे.
