एचपी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा दुसरा विजय
पुणे : हेमंत पाटील (एचपी) प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत शिवाली शिंदेच्या 33 धावांच्या खेळीच्या जोरावर जनादेश इंडिया संघाचा 4 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदविला.
शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदा खेळताना जनादेश इंडिया संघाने 20षटकात 4बाद 94धावा केल्या.यात सुष्मा पाटीलने 53 चेंडूत 1चौकारासह नाबाद सर्वाधिक 52धावा, रोहिणी मानेने 13 धावा केल्या. हे आव्हान व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 17.2षटकात 6बाद 95धावा करून पूर्ण केले. यामध्ये शिवाली शिंदेने 33, श्रद्धा पोखरकरने नाबाद 17 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामनावीर शिवाली शिंदे ठरली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
जनादेश इंडिया: 20षटकात 4बाद 94धावा(सुष्मा पाटील नाबाद 52(53,1×4), रोहिणी माने 13, उत्कर्षा पवार 1-19)पराभूत वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 17.2षटकात 6बाद 95धावा(शिवाली शिंदे 33(26,3×4), श्रद्धा पोखरकर नाबाद 17, तेजल हसबनीस 2-20, नेहा गुरव 1-8, रोहिणी माने 1-21);सामनावीर-शिवाली शिंदे; व्हेरॉक संघ 4 गडी राखून विजयी.
