Pune – मानाचा दूसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि तिसरा गुरुजी तालिम गणपतीचे विसर्जन
पुणे: मागच्या वर्षी प्रमाने या वर्षी पण शासनाने गणपती मंडळाना विसर्जन न करण्याचे आवाहन केले आहे.त्याचे मंडळानी पालन केले आहे. विसर्जन मिरवणुकीला बंदी असली तरी पुण्यातील मानाच्या गणपतीनी त्याच्या दरवर्षीच्या पद्धतीनुसार या वर्षी मंडपात छोटीशी मिरवणूक काढली आहे. पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती ने पालखीत मिरवणूक काढून बाप्पाचे पर्यावरण पूरक विसर्जन होंदा मध्ये केले आहे. मानाच्या दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी ने पण रथामध्ये मिरवणूक काढून बाप्पाचे पर्यावरण पूरक विसर्जन होंदा मध्ये केले आहे. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाने दरवर्षीप्रमाणे गुलाल उधळत नादब्रम्ह पथक वाजवत मंडपात मिरवणूक काढून पर्यावरण पूरक होंदा मध्ये बाप्पाचे विसर्जन केले आहे. यावेळी मंडळ चे अध्यक्ष प्रवीण शाम सिंग परदेशी,खजिनदार प्रदीप खिस वंरा, आकाश ठाकूर मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
