Sunday, August 2, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

मनोहर भोसलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बारामतीः संत श्री बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील एकाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला आज बारामती न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर करमाळा न्यायालायने त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच याच गुन्ह्यात दुसरा आरोपी ओंकार शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मनोहर उर्फ मामा भोसले याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बारामती जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीस श्रीमती रणवीर यांच्यासमोर त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या अर्जावर अॅड. रुपाली ठोंबरे, हेमंत नरूटे यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाचा आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने मनोहर भोसलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यानंतर करमाळा पोलीसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

दरम्यान बारामतीमधील शशिकांत खरात यांच्या फिर्यादीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात मनोहर भोसले, ओंकार शिंदे, विशाल वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

आज सुनावणीला सुरुवात होताच सरकारी पक्षाच्या वकिलाने न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर आरोपीच्या वकिलानी यावर आक्षेप घेतला. आरोपीला 7 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. ही मागणी करण्यामागे तिसरा आरोपी पोलीसात हजर झालेला नसताना एकत्र तपास होणे गरजेचे आहे. मात्र पोलिसांनी एकतर हा तपास करू दिला नाही. त्यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे आम्ही पोलीस कोठडीची मागणी केल्याची माहिती अॅड रुपाली ठोंबरे आणि अॅड नरूटे यांनी दिली. आम्ही यासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे अॅड रुपाली ठोंबरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading