Pune – मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचे गज कुंडामध्ये विसर्जन
पुणे: दुपार झाली तरी मानाच्या गणपतीचे विसर्जन चालू आहे. गणेश भक्ताचा उत्साह अजूनही दिसत आहे. पाऊस रिमझिम पडत होता तरीही भक्तांचा
व कार्यक्रत्याचा उत्साह दिसून येत होता. मानाच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मानाच्या गणपतींचे मंडळांचे विसर्जन साधेपणाने उत्साहात पार पडले. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग याठिकाणी फक्त पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला . बाकीचे चार मानाचे गणपती यांनी शासनाचे पालन केले. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा यांनी कुठलीही मिरवणूक न काढता गणपतीचे विसर्जन गज कुंडामध्ये केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आमदार मुक्ता टिळक केसरीवाडा मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक, डॉक्टर दीपक टिळक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
