Sunday, August 2, 2026
BusinessLatest News

टीव्हीएस Gen Z साठी सादर करत आहे  TVS Raider 

होसूर :  संपूर्ण जगभरात प्रतिष्ठित म्हणून गणली जाणारी दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांची उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनीने भारतातील आणि जगातील महत्त्वाकांक्षी युवा पिढीसाठी १२५ सीसी सेगमेंटमध्येअनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज टीव्हीएस रेडर (TVS Raider) सादर करत असल्याची घोषणा आज केली.  अतिशय ठळकपणे युवा आणि स्पोर्टी असलेली ही मोटरसायकल आपल्या श्रेणीत पहिल्यांदाच आणल्या जात असलेल्या अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. यामध्ये रिव्हर्स एलसीडी डिजिटल स्पीडोमीटरव्हॉइस असिस्टसह ५-इंची टीएफटी क्लस्टर (पर्यायी)वेगवेगळे राईड मोड्स आणि या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिली जात असलेली अंडर-सीट स्टोरेजची सुविधा यांचा यामध्ये समावेश आहे.

टीव्हीएस मोटर कंपनीचे डायरेक्टर आणि सीईओ  केएन. राधाकृष्णनयांनी सांगितले, “टीव्हीएस मोटर कंपनी जगातील जवळपास प्रत्येक खंडातील ग्राहकांना उत्पादने व सेवा पुरवते.  टीव्हीएस रेडर सह आमच्या पोर्टफोलिओमध्ये नव्या जागतिक मोटरसायकल प्लॅटफॉर्मचा समावेश करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आजच्या युवा आणि डिजिटल विश्वात रुळणाऱ्या Gen Zसाठी ही गाडी डिझाईन करण्यात आली आहे.  त्यांना अनुसरून या गाडीमध्ये अत्याधुनिक वाहन व कनेक्टेड तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.  मला पक्की खात्री आहे की भारत आणि जगभरातील आमच्या युवा ग्राहकांना टीव्हीएस रेडर खूप आवडेल.”

टीव्हीएस मोटर कंपनीचे कम्युटर्सकॉर्पोरेट ब्रँड अँड डीलर ट्रान्सफॉर्मेशन विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग) श्री. अनिरुद्ध हलदर यांनी सांगितले, “टीव्हीएस मोटर कंपनी नेहमीच Gen Zला आपले प्रमुख ग्राहक मानत आली आहे.  इव्ही – टीव्हीएस आयक्यूब आणि टीव्हीएस अपाचे सीरिजमधील टीव्हीएस रेसिंग व टीव्हीएस एनटीओआरक्यू १२५ यांसारख्या आमच्या ब्रँड्सचा समावेश Gen Zच्या सर्वात आवडीच्या ब्रँड्समध्ये होतो. नेकेड स्ट्रीट स्टायलिंगश्रेणीतील सर्वोत्तम ऍक्सिलरेशनराईड मोड्स आणि मोनो-शॉकवर आधारित राईड-हँडलिंग व या सर्वांसह टीव्हीएस intelliGO व ETFi चलित मायलेज कामगिरी या सर्व वैशिष्ट्यांनी आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण टीव्हीएस रेडर पुन्हा एकदा त्यांचे लक्ष वेधून घेणार आहे.

टीव्हीएस रेडरचे ड्रम आणि डिस्क हे दोन प्रकार आहेत आणि किंमत ७७,५०० रुपयांपासून (एक्स-शोरूमदिल्ली) पुढे आहे.  यामध्ये स्ट्रायकिंग रेडब्लेझिंग ब्ल्यूविकेड ब्लॅक आणि फायरी यलो हे रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.    

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading