Pune – मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मंडळाच्या गणपतीचे गज कुंडामध्ये विसर्जन; कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद
पुणे:आज सकाळ पासून पुण्यात मानाच्या गणपतींचे विसर्जन होत आहे.सकाळ पासून भक्तांचा उत्साह दिसून आला .मानाच्या पहिल्या , दुसऱ्या,तिसऱ्या गणपती मंडळाचे विसर्जन वेळेवर पार पडले.मंडळानी पोलिसाना व शासनला सहकार्य केले. काही भक्तांनी तर ऑनलाइन दर्शन घेतले. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे पण विसर्जन करण्यात आले. बाप्पाचे विसर्जन गज कुंडामध्ये करण्यात आले. मिरवणूक चालू असताना भक्तांकडून कोरोनाच्या नियमाचे
उल्लंघन होताना दिसले. मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये व पोलिसांमध्ये काही काळ वाद निर्माण झाला. कार्यकर्ते पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करताना दिसले. कार्यकर्त्यांच्या गणपती बाप्पा मोरया असा जयघोष सुरू होता. कार्यकर्ते मिरवणुकीदरम्यान लावलेल्या गाण्यावर पोलीसांकडे लक्ष न देता नाचत होते. शासनाने व पोलिसांनी घातलेल्या नियमांचे तुळशीबाग मंडळ सरास उल्लंघन झाले असल्याचे दिसून आले. गणपती विसर्जनाच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
