भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट गणपती मंडळाची भंडारा उधळून विसर्जन मिरवणूक
पुणे: सकाळी अकरा वाजल्यापासून मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक साधेपणाने पुण्यात सुरू आहे. दरवर्षी मानाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर पुण्यातील बाकीचे मंडळ विसर्जनाला निघतात. श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्ट हा मंडळ दरवर्षी गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम करत असतो. ते दर वर्षी भंडाराची उधळून विसर्जन मिरवणूक काढतात. पण मागील व यंदाच्या वर्षी कोरोना या रोगामुळे त्यांनी आपला गणपती माडंवात विसर्जन केला.
यावर्षी त्यांनी मंडळाच्या गणपतीचे गज कुंडामध्ये विसर्जन केले. या विसर्जनाच्यावेळी मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, महापौर मुरलीधर मोहोळ, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्याची शान गणेशोत्सव आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी वर्षभर या उत्सवाची वाट बघत असतात. कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सलग दोन वर्षे पुण्यातील गणेशोत्सव हा शांततेत होत आहे. पुण्यातील काही मंडळांनी गणेशोत्सव मध्ये कोरोना हा कायमचा निघून जावा. म्हणून रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी यासारखे विविध कार्यक्रम मंडळे दोन वर्षे राबवत आहेत. जर पुढच्यावर्षी कोरोना नसेल तर पुढच्या वर्षी जोरात गणेशोत्सव करू. असे मोहोळ म्हणाले.
