Sunday, August 2, 2026
Latest NewsPUNE

पीएमपी – मार्ग क्रमांक ११८ चे विस्तारीकरण; स्वारगेट ते अजिंक्यतारा सोसायटी मार्गे तुकाईनगर बस सेवा सुरू

पुणे : पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक ११८ स्वारगेट ते वडगाव (वेणूताई कॉलेज) या मार्गाचे विस्तारीकरण करून स्वारगेट ते अजिंक्यतारा सोसायटी मार्गे तुकाई नगर अशी बस सेवा १९ सप्टेंबर २०२१ पासून सुरू करण्यात आली. या बस सेवेचे उद्घाटन आमदार भीमराव तापकीर व  हरिदास चरवड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी  सचिन मोरे, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक  दत्तात्रेय झेंडे, स्वारगेट डेपो मॅनेजर राजेश कुदळे, असिस्टंट डेपो मॅनेजर विकास मते, स्वारगेट डेपोचे कार्यालय अधीक्षक सुनील कांबळे यांच्यासह परिसरातील सोसायट्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्ग क्रमांक ११८ स्वारगेट ते अजिंक्यतारा सोसायटी मार्गे तुकाई नगर या बससेवेचा मार्ग स्वारगेट, पर्वती पायथा, विठ्ठलवाडी जकात नाका, विठ्ठलवाडी, आनंद विहार कॉलनी, साईनगर, महादेव नगर, तुकाई नगर, भन्साळी कॅम्पस, सिंहगड कॉलेज पायथा/ वडगाव पोलीस चौकी, सिंहगड कॉलेज गेट, औदुंबर चौक (दत्त मंदिर), ज्ञानोबा चरवड नगर, अजिंक्यतारा सोसायटी असा असणार आहे.

आमदार भीमराव तापकीर म्हणाले,” चरवड वस्ती परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना ही बस सेवा सुरू झाल्यामुळे किफायतशीर दरात हक्काची प्रवासी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळून पीएमपीएमएल प्रशासनाला या मार्गावर आणखी बसेस वाढवाव्या लागतील.”
नगरसेवक हरिदास चरवड म्हणाले,” या परिसरातील नागरिकांना पुणे शहरात जाण्यासाठी बसची आवश्यकता होती. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी ही बससेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading