Saturday, August 1, 2026
Latest NewsSports

एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स क्रिकेट क्लब संघाचा सलग दुसरा विजय

  • डेक्कन जिमखाना, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट संघाचे विजय

पुणे: हेमंत पाटील(एचपी) प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत आर्यन्स क्रिकेट क्लब संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसरा विजय मिळवला. तर, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, डेक्कन जिमखाना या संघांनी विजयी सलामी दिली.

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात तुषार श्रीवास्तव(63धावा)याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने जनादेश इंडिया संघाचा 8 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना जनादेश इंडिया संघाने 20षटकात 8बाद 159धावा केल्या. यात योगेश चव्हाण 28, अभिमन्यू जाधव 25, ऋषिकेश सोनावणे 21 यांनी धावा केल्या. डेक्कन जिमखाना कडून पियुष साळवी 3-41, आशय पालकर 2-26, स्वप्नील चोरडिया 1-37) यांनी सुरेख गोलंदाजी करत जनादेश इंडिया संघाला 159 धावांवर रोखले. याच्या उत्तरात डेक्कन जिमखाना संघाने 15.1षटकात 2बाद 161धावा करून पूर्ण केले. यामध्ये तुषार श्रीवास्तवने 33चेंडूत 5चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 63 धावा व स्वप्नील गुगळेने 18 चेंडूत 34धावा केल्या. सलामीच्या जोडीने 37 चेंडूत 82 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर धीरज फटांगरेने 30 चेंडूत नाबाद 39, स्वप्नील फुलपगार नाबाद 15 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी तुषार श्रीवास्तव ठरला. 

लोहगाव येथील वीरांगना क्रिकेट मैदानावरील दुसऱ्या सामन्यात चुरशीच्या झालेल्या लढतीत सुधांशु गुंडेती(24 धावा व 2-1) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 5 धावांनी पराभव केला. अन्य लढतीत अनिकेत पोरवाल 58धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आर्यन्स क्रिकेट क्लब संघाने पुना क्लब संघाचा 12 धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading