Saturday, August 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पत्रकार परिषद न घेण्याचा मोदींचा गुण आवडतो – प्रीतम मुंडे

बीड – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र, मोंदीच्या या कृतीवर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांचं वेगळच म्हणणं आहे. मोदींचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुणच आपल्याला आवडत असल्याचं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे यांनी हे विधान केलं आहे. मोदींचा मला सर्वात जास्त आवडणारा गुण म्हणजे त्यांनी गेल्या सात वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही म्हणून त्यांच्यावर टीका झाली. पण ते आपलं काम करत आहेत. आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत, असं मुंडे म्हणाल्या.

मोदींबद्दल चांगलं बोलणारे दहा लोकं असतील तर टीका करणारे चारदोन लोक असतातच. पण त्या टीकेने मोदी विचलीत होत नाहीत. ते आपलं काम करत राहतात, असंही त्या म्हणाल्या.बीड राष्ट्रवादी मुक्त करूयावेळी त्यांनी बीड राष्ट्रवादी मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. बीड जिल्ह्याला भ्रष्टाचारी राष्ट्रवादीपासून मुक्त करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी झटून काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं. सध्या कंत्राटदारांना हाताशी धरून आपणच काम केल्याचा आव आणला जात आहे. तशा बातम्याही पेरल्या जात आहेत.

ज्या रस्त्याशी ज्यांचा संबंध नाही, त्या रस्त्याच्या कामाचं श्रेयही हे लोक घेत आहेत, असा चिमटाही त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना काढला.एकाच मंचावर, पण एकमेकांशी बोलणं टाळलंराज्याच्या राजकारणात मुंडे घराण्याला मोठे स्थान आहे. या घराण्यातील नेत्यांच्या एका इशाऱ्यावर अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. धनंजय मुंडे आणि प्रीतम, पंकज मुंडे यांच्यातील राजकीय वैरसुद्धा महाराष्ट्रासाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. या बंधू-भगिनींमधील राजकीय चढाओढ आपण अनेकदा पाहिली आहे. त्यांच्या याच राजकीय वैराची झलक बीडमधील परळी येथील एका कार्यक्रमात पाहायला मिळाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading