fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून आंदोरा येथे जनजागृती शिबीर, रक्तदान शिबीर व वृक्षारोपण

पिंपरी/कळंब : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून आंदोरा (ता. कळंब जि.उस्मानाबाद (धाराशिव)) येथे विधी सेवा समिती कळंब अभियानांतर्गत जनजागृती शिबीर, रक्तदान शिबिर व वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कळंब पंचायत समिती व ग्रामपंचायती मार्फत करण्यात येणारी वृक्षलागवड व पर्यावरणाचा विचार करता पीजी कन्स्ट्रक्शनचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते पीजी नाना तांबारे यांच्या तर्फे सामाजिक कार्य म्हणून पाचशे वृक्ष व ट्री गार्ड ग्रामपंचायतीला देण्यात आली. याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबीरही घेण्यात आले.


नवीन पशुवैद्यकीय दवाखाना ते भीमनगर आंदोरा सभागृहापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभही यानिमित्ताने करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना कळंब न्यायालयाचे न्यायाधीश कुडते साहेब, कळंब पोलीस स्टेशनचे एपीआय पवार साहेब, ॲड. प्रवीण यादव, ॲड. गवळी सर, ॲड.आगलावे सर, ॲड. चंद्रशेखर तांबारे, डॉ. जोगंदड ताई व सर्व आशाताई, ग्रामसेवक व कर्मचारी, रोजगार सेवक, मा.सरपंच, उपसरपंच, ग्रामसदस्य, सदस्या तसेच तंटामुक्ति अध्यक्ष, उपअध्यक्ष व समस्त गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान कायदे विषयक, आरोग्य विषयक, तसेच पर्यावरण व रक्तदाना विषयी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading