Sunday, August 2, 2026
BusinessLatest News

अनअकॅडेमीने केली कोडशेफ स्नॅकडाऊन २०२१ची घोषणा

पुणे : भारतातील आघाडीचा शिक्षण प्लॅटफॉर्म अनअकॅडेमीने स्नॅकडाऊनच्या सहाव्या आवृत्तीची घोषणा केली आहे. स्नॅकडाऊन ही एक अनोखी, विविध फेऱ्यांचा समावेश असलेली प्रोग्रामिंग स्पर्धा आहे. सर्व शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नोकरदार व्यावसायिक देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात.

‘स्नॅकडाऊन’ची सुरुवात कोडशेफ ने २०१० साली केली होती, संपूर्ण जगभरातील सर्वोत्तम प्रोग्रॅमर्सच्या दरम्यान स्पर्धा घडवून आणावी हा यामागचा उद्देश आहे. जून २०२० मध्ये अनअकॅडेमीने कोडशेफची कस्टोडियनशिप स्वतःकडे घेतली. ‘स्नॅकडाऊन २०२१’साठी नोंदणी सुरु झाली असून ती १९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरु राहील. पहिली ऑनलाईन पात्रता फेरी १४ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत होईल. याची महाअंतिम फेरी ९ जानेवारी २०२२ रोजी होईल. तपशीलवार वेळापत्रक आणि स्पर्धेच्या तयारीविषयी माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.

यंदाच्या वर्षी महामारीमुळे ‘स्नॅकडाऊन २०२१’ मध्ये फक्त वैयक्तिक सहभागास परवानगी देण्यात आली आहे. ‘स्नॅकडाऊन २०२१’ च्या भाग्यशाली विजेत्याला/विजेतीला १०,००० डॉलर्स आणि स्नॅकडाऊन गोल्ड ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल. प्रथम व द्वितीय उपविजेत्याला/उपविजेतील अनुक्रमे ७५०० डॉलर्स व ५००० डॉलर्सची रोख बक्षिसे तसेच ट्रॉफीज् आणि मर्चन्डाईझ जिंकता येतील. पहिल्या दहा भारतीय प्रोग्रॅमर्सना आणि जागतिक रँकिंगमधील ४ ते २५व्या स्थानांवरील प्रोग्रॅमर्सना रोख बक्षिसे दिली जातील.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोग्रॅमर्सना स्नॅकडाऊन २०२१ या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading