पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या 253 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून दोनशे च्या आत आज रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 175 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 253 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 99 हजार 228 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 88 हजार 450 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 7रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 5तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8997 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 1781 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 176 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 7891 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
