Sunday, August 2, 2026
Latest NewsPUNE

लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्यावतीने पोलिसांना चिक्की वाटप

पुणे : श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट पुणे व लायन्स क्लब पूना सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस बांधवांना चिक्की वाटप करण्यात आले. फरासखाना पोलिस स्टेशन तसेच छत्रपती संभाजी पोलिस चौकी येथे  चिक्कीचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लबच्यावतीने पोलिसांना ५०० किलो चिक्की वाटप करण्यात आले आहे.

यावेळी सहायक पोलिस आयुक्त बजरंग देसाई पोलिस निरीक्षक विजय जाधव, विश्वास भोर, लायन्स क्लब पुन्हा सिटीचे प्रेसिडेंट नंदकुमार पापळ, श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप काळभोर, कार्याध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दीपक थोरात, नरेंद्र गाजरे, बाळासाहेब ताठे, महेश अंबिके, रमेश मणियार उपस्थित होते.

दीपक थोरात म्हणाले,  पोलिस बांधव हे सणवार, उत्सव असताना अहोरात्र काम करीत आहेत. या काळात त्यांच्यावर मोठा ताण असतो. त्यामुळे  त्यांच्यासाठी आरोग्यवर्धक आणि उर्जादायक चिक्कीचे वाटप करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading