लीला पासवानचा शोध सुरु. कोण आहे ती?

सत्य घटनांवर प्रेरित एमएक्स ओरिजनल सीरिज ‘एक थी बेगम’च्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. यातील साहसी आणि धाडसी अशरफ उर्फ सपनाने घातक स्त्री बनून पतीच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली. तिने तिरस्काराची परिसीमा गाठली. तिने सर्व बाबी स्वतःच्या हातात घेतल्या आणि एका अशा वळणावर येऊन सिझन १ चा शेवट झाला, जिथे अशरफचे आयुष्य शिल्लक आहे की नाही, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित ‘एक थी बेगम २’ लीला पासवान या महिलेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिचे नाव प्रामुख्याने पुरुषांच्या जगातच प्रसिद्ध नसून अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारणीही तिच्या शोधात आहेत.

तज्ज्ञांच्या मते ती सामान्य स्त्री नाही. मग कोण आहे लीला पासवान?

Leave a Reply

%d bloggers like this: