Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

PMRDA – प्रारुप आराखड्याच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या हरकती नोंदवण्यासाठी कॉँग्रेसतर्फे कायदेशीर मार्गदर्शन

पुणे : पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी लिगल सेल (विधी विभाग) अंतर्गत भोर तालुका काँग्रेस विधी विभागाचेवतीने आमदार संग्राम थोपटे व पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आमदार संजय जगताप यांच्या सूचनेनुसार पी. एम. आर. डी .ए. प्रारुप आराखड्याच्या संदर्भात यांच्या सुचनेनुसार शेतकऱ्यांच्या हरकती नोंदवण्याचे काम तसे मोफत कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम ठिकाण अमृता डीलक्स्, कापुरव्हळ वेळ सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत आणि मुक्तांगण आवार , कोंढणपूर फाटा  वेळ दुपारी ३ते ५ वेळी ठेवण्यात आली होती, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर बाधित शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदविल्या. या कार्यक्रमाचे आयोजन भोर तालुका काँग्रेस कमिटीलिगल सेलचे अध्यक्ष अँड. राकेश कोंडे यांनी केले.
सदर या कार्यक्रमास पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी लिगल सेल अध्यक्ष अँड. राहुल ढाले पाटील ,उपाध्यक्ष अँड. श्रीनिवास खुंटे, MPCC चे अँड. कांकरिया यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भोर तालुका काँग्रेस कमिटी लिगल सेल अध्यक्ष अँड. राक कोंडे आणि भोर पंचायत समिती सदस्य श्री. रोहन बाठे, भोंगवलीचे सरपंच श्र. अरुण पवार, कापूव्होळचे सरपंच श्री. किरण गाडे. भांबवडेचे सरपंच श्री. गरुड आणि बाधित शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन  भोर तालुका काँग्रेस कमिटी लिगल सेलअध्यक्ष अँड . राकेश कोंडे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading