एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत 10 निमंत्रित संघ सहभागी

पुणे : हेमंत पाटील (एचपी) प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एचपी प्रीमियर लीग पुरुष गटाच्या क्रिकेट स्पर्धेत शहरातील 10 निमंत्रित संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पुना क्लब, वीरांगणा क्रिकेट मैदान, लोहगाव या मैदानावर आज17 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
या स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, केडन्स, डेक्कन जिमखाना, हेमंत पाटील क्रिकेट अकादमी, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, जनादेश इंडिया, क्लब ऑफ महाराष्ट्र, युनायटेड क्रिकेट क्लब, पुना क्लब आर्यन क्रिकेट क्लब हे 10 निमंत्रित संघ झुंजणार आहेत. तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत रणजी पटू नौशाद शेख, स्वप्निल गुगळे, मनोज इंगळे असे मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. सलामीचा सामना हेमंत पाटील क्रिकेट अकादमी व आर्यन्स क्रिकेट क्लब यांच्यात तर, दुसरा सामना डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्यात डेक्कन जिमखाना मैदानावर होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सामनावीर, मालिकावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज यांना करंडक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे अशी माहीती इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: