बलात्कार करणा-या नराधमांकरीता हैदराबाद पॅटर्न राबवा

पुणे : बलात्कार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे… पोलिसांनी असल्या केस प्रकरणात हैदराबाद पॅटर्न चा आदर्श घ्यावा… फास्ट ट्रॅक कोर्टात सदरची केस चालवा… बलात्कारी नराधमांची केस कोणत्याही वकिलांनी घेऊ नका… अशा घोषणा देत शिवाजीनगर न्यायालयासमोर पतित पावन संघटनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. हैदराबाद पॅटर्न राबवा, नाहीतर आम्ही मुळशी पॅटर्न राबवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पतित पावन संघटनेतर्फे शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ समोर महाराष्ट्रातील बलात्कार करणा-या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे राजाभाऊ पाटील, मनोज नायर, दिनेश भिलारे, गोकुळ शेलार, विश्वास मनेरे, स्वप्नील नाईक, अरविंद परदेशी, निलेश जोशी, विजय क्षीरसागर, योगेश वाडेकर, यादव पुजारी, विजय गावडे, अनिकेत बांदल, अमर काकडे, सूरज पोटे, विनायक ठाकूर, शैलेश उनवणे आदी उपस्थित होते.

स्वप्नील नाईक म्हणाले, विद्येचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पुण्यनगरीसह संपूर्ण महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला असुरक्षित होत आहेत. अशा नराधमांकरीता महाराष्ट्र पोलिसांनी हैदराबाद पॅटर्न वापरला पाहिजे, जेणेकरून या अशा गैरकृत्यांना चाप बसेल.ज्या महिला भगिनींना पुण्यात कुठेही असुरक्षित वाटत असेल, तर त्यांच्यासाठी सातही दिवस २४ तास पतित पावन संघटना पाठीशी उभी आहे. काही अडचण आल्यास किंवा मदतीकरीता ८७९३३५६३६६ या क्रमांकावर महिलांनी संपर्क साधावा. आम्ही सर्व तरुणांना व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: