महर्षीनगर सार्वजनिक गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिरात ५८ बाटल्यांचे संकलन

पुणे : महर्षीनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मयूर रवींद्र डोके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंडळातर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये समाजातील विविध स्तरातील युवक-युवती, तसेच ज्येष्ठानीही सहभाग नोंदवला. सह्याद्री रक्तपेढीचे या शिबिरासाठी सहकार्य लाभले. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष सहभाग घेऊन रक्तदान केले.

मंडळाचे पदाधिकारी असलेल्या मयूर डोके यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांना रक्तदान शिबिरातून श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि सद्यस्थितीतील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सर्व मित्रांनी हा उपक्रम घेण्याचे ठरवले. महर्षिनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश लोहकरे, उपाध्यक्ष तन्मय पोमन, कार्याध्यक्ष पुष्कर प्रसाद आबनावे, शांताराम पोमन, राहुल गुंड, हर्षद पप्पू पोमण, साई माने, प्रतीक मुनोत, तेजस घाडगे, मनोज जाधव, इरफान शेख यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

Leave a Reply

%d bloggers like this: