हसना तो मेरी आदत है- पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता

पुणे: मी खेडेगावातून शहरात आलो आहे. प्रत्येक तरुणाने कष्ट करण्याची तयारी ठेवली प्रत्येक माणूस हा पुढे जाऊ शकतो. मी जेव्हा पोलिसांची परीक्षा दिली
तेव्हा माझ्याबरोबर परीक्षेला अडीच हजार विद्यार्थी होते त्यात माझा पहिला नंबर आला. मी बोलत नाही तर करून दाखवतो. हसना तो मेरी आदत है असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलताना सांगितले. 

यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे उपस्थित होते. अमिताभ गुप्ता म्हणाले, गणेशोत्सवात जे आम्हाला शासनाने जे निबंध लावायला सांगितले आहेत ते आम्ही लावले. शहरात लोक गणपती बघायला गर्दी करत आहेत, शहरातल्या गल्लीबोळात व मुख्य चौकात  आम्ही  बॅरिकेट्स रात्री 10 नंतर लावले आहेत.  राज्य सरकारच्या आदेशानुसार आम्ही संचारबंदी असल्याचेही त्यांनी सांगितले. 
मागच्या 2  वर्षा मध्ये जास्त  झाले मागच्या वर्षी टाळेबंदी मध्ये सगळे घरी असल्या मुळे काहीही क्राईम झाले नाही. पण आता सगळे खुले झाल्या पासून क्राईम वाढायला लागले आहेत.  शहरात बलात्कारा चे प्रमाण वाढत आहे . त्यावर पण त्यांनी भाष्य केले आगामी काळात महिला सुरक्षिततेला अधिकाधिक प्राधान्य प्राधान्य देणार असल्याचे सांगत  वाढत्या गुन्हेगारीला पुढच्या तीन महिन्यात चाप लावण्यार असा इशाराही  त्यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: