कोरोना आणि लॉकडाउन मुळे रोजगार बुडालेल्यांना एक हात मदतीचा देणे कर्तव्यच – चंद्रकांत पाटील

पुणे : कोरोनाच्या संकटकाळात अनेकांचे रोजगार बुडाले, उद्योग धंदे बंद पडले अश्या परिस्थितीत कलाकारांना ही मोठ्या प्रमाणात ह्या संकटाचा फटका बसला, यात सर्कस मधील कलाकारांना आधार देण्याची भूमिका मांडताना त्यांच्या कलेचे प्रदर्शन करून त्याद्वारे त्यांना मदत करत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. अश्या दुर्लक्षित घटकांना एक हात मदतीचा देणे हे मी माझे कर्तव्य मानतो असेही पाटील म्हणाले.कोथरूड मधील स्वप्नशिल्प सोसायटीत सर्कस चा ऑनलाईन प्रयोग सादर करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
या उपक्रमाच्या समन्वयक भाजप उद्योग आघाडीच्या संयोजिका अमृता देवगावकर म्हणाल्या की आत्तापर्यंत 23 ऑनलाईन प्रयोग झाले असून त्या माध्यमातून आत्तापर्यंत 23 कलाकारांना प्रत्येकी 5000/ रुपये मदत देण्यात आली आहे. यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सहकार्य केले असून
रॅम्बो सर्कस चे विदूषक प्रत्येक सोसायटीत उपस्थित राहून बाल गोपालांचे मनोरंजन करणार आहेत.असे प्रयोग झूम आणि youtube च्या माध्यमातून विविध शाळांमध्ये मागच्या महिन्यात  यशस्वीपणे पार पडले.  विपरीत परिस्थितीशी झगडून सर्कस ची कला  टिकविणारे रँबो सर्कस चे संचालक सुजित दिलीप यांचा यावेळी चंद्रकांतदादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक दीपक पोटे,भाजप पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,स्वप्नशिल्प सोसायटी चे दिलीप देशपांडे, विवेक विप्रदास, प्रशांत भोलागीर, सुभाष झानपुरे,शहर चिटणीस प्रशांत हरसुले,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर,उद्योग आघाडीचे संतोष परदेशी, रामदास गावडे,स्मिता कुलकर्णी, अतुल राऊत,प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे,अमोल डांगे इ मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: