किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार – हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने १२७ कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत २७०० पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केला. त्यानंतर लगेचच हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. माझ्या कुटुंबाची आणि माझी बदनामी झाली. गेल्या १७ वर्षांपासून मी राजकारणात आहेत. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात अब्रुनुकसानीची १०० कोटींचा फौजदारी दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात मी दाखल करणार आहे. मी आतापर्यंत ५० कोटींचे अब्रुनुकसानीचे ६ दावे दाखल केले आहेत. आता हा ७ वा दावा दाखल करणार आहे, असेही ते म्हणाले. 

मुशरीफ म्हणाले,  किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आले असते. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा आरोप सोमय्यांनी माझ्यावर केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काहीही कारवाई झालेली नाही. मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माझ्या घरावर धाड टाकली. त्यात काहीच आढळले नाही. कारखान्यामध्ये त्यांना संशय होता मात्र ते प्रकरण आता न्याप्रविष्ट आहे. अडीच वर्ष धाड टाकून झाली. त्यात अजून काहीच कारवाई झाली. त्याबाबत मी सर्व उत्तरे दिलेली आहेत. मात्र माझ्यावर करण्याच आलेल्या आरोपानंतर कदाचित सोमय्यांना काही माहिती नसावं. वास्तविक त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी माहिती दिली. त्यामुळे त्यांनी हे आरोप केले असावे. त्यांना कागलला येऊन माहिती घ्यायला पाहिजे होती, असेही मुश्रीफ यांनी यावेळी म्हटले आहेे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: