Tuesday, June 16, 2026
Latest NewsSportsTOP NEWS

US Open 2021: ब्रिटनच्या एम्मा रादुकानूने वयाच्या18व्या वर्षी रचला इतिहास; पटकावला यूएस ओपनचा किताब

US Open 2021: अठरा वर्षीय एम्मा रडुकानूने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत 19 वर्षीय लेला फर्नांडिसचा 6-4, 6-3 असा पराभव करत आपले पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे स्पर्धेच्या सुरुवातीपासून ती रॅकिंगमध्ये 150व्या क्रमांकावर होती. इतक्या कमी रॅकिंगसह वयाच्या केवळ 18 व्या वर्षी ग्रँड स्लॅम एकेरीचे विजेतेपद जिंकणारी ती ब्रिटनची पहिली महिला खेळाडू ठरली असून तिने एक इतिहास रचला आहे.

अंतिम सामन्यात रादुकानूनं अंतिम सामन्यात लीलहला वापसी करण्याची एकही संधी दिली नाही. लीलहनं पहिल्या सेटमध्ये रादु  कानूसमोर मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न केला. पण ती अयशस्वी ठरली. दुसरा सेटही एम्मा रादुकानूनं धमाकेदार खेळी करत सामना अगदी सहज जिंकला. यूएस ओपनच्या ट्विटर हँडलवरुन एम्मा रादुकानूला यूएस ओपनचा किताब जिंकल्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 2021 च्या यूएस ओपनमध्ये रादुकानूनं उत्तम खेळी करत यूएस ओपनचा किताब पटकावला. संपूर्ण स्पर्धेत रादुकानूने एकही सेट गमावला नाही. यूएस ओपन 2021 मध्ये रादुकानूनं एकूण 9 सामने खेळले आणि सर्व सामन्यांत सरळ सेटमध्ये विजय मिळवला. एम्मा रादुकानूनं यूएस ओपन स्पर्धेत आपल्या खेळाने सर्वांना थक्क केल आहे.

(फोटो सौजन्य – @EmmaRaducanu/FB)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading