CISF अधिकारी गीता समोताने यांची कामगिरी, किलीमंजारो शिखर सर्वात जलद सर करण्याचा केला विक्रम

मुंबई : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महिला अधिकारी गीता समोता यांनी आफ्रिका खंडातील किलिमंजारो हे 16000 फूट उंच पर्वत चढून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. या सोबतच गीता या किलिमंजारो पर्वतावर सर्वात जलद चढणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. गीता या सीआयएसएफच्या उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी रशियातील एलब्रस पर्वतावर चढाई केली होती. यासह गीता समोता या अशी कामगिरी करणाऱ्या CISF च्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

किलिमंजारो पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून 5,895 मीटर इतकी आहे. हा जगातील सर्वात उंच मुक्त पर्वत आहे आणि किलिमंजारो पर्वताच्या शिखरावर तीन ज्वालामुखी शंकू आहेत. यापूर्वी आंध्र प्रदेशातील ऋत्विका या नऊ वर्षांच्या मुलीनेही या पर्वतावर चढाई केली होती. ती किलिमांजारो चढणारी सर्वात लहान आशियाई मुलगी आहे. किलीमंजारो शिखर हे पृथ्वीवरील चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे स्थान मानले जाते.

विक्रम प्रस्थापित केल्यानंतर गीता समोता यांनी एक ट्विट करत आपल्या विक्रमाची माहिती दिली. त्यात गीता म्हणतात, “स्वतःवर विश्वास ठेवा आणि जगाला तुमच्या कर्तृत्वाची जाणीव करून द्या. महिलांची शक्ती आफ्रिकेच्या शीर्षस्थानी चमकत आहे, ज्यामुळे भारत आणि सीआयएसएफच्या महिलांना अभिमान वाटतोय.”

(फोटो सौजन्य : @geeta_samota/fb)

Leave a Reply

%d bloggers like this: