fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNE

पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 196 कोरोनाचे नवीन रुग्ण

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून आज दोनशे च्या वरती रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 196नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 218रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 98हजार 183 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 87हजार 165इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 5रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 4तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8977जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2041रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 217रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5722
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading