भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

अहमदाबाद : गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांचे नाव आज जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून आमदार आहेत.

विजय रूपाणी यांनी शनिवारी अचानक गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्या नंतर गुजरातचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार याबद्दल उत्सुक्ता होती. त्यानंतर लगेचच आज नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गांधीनगर येथील भाजप कार्यालयात झाली. या बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे.

गुजरातचे नवे मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: