Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

‘बार्टी’ संस्था बंद पाडण्याचा डाव? 59 पैकी अनेक योजना बंद

पुणे :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)  पुणे अंतर्गत विविध प्रकारच्या 59 योजना राबविण्यात येतात. मात्र मागील दोन वर्षांपासून यातील अनेक योजना निधी अभावी बंद झाल्या आहेत. या योजना बंद करून भविष्यात ‘बार्टी’ संस्था बंद पाडण्याचा डाव तर नाही ना? असा सवाल स्टुडंट स्टुडंट हेल्पिंग हॅंडचे कुलदीप आंबेकर यांनी उपस्थित केला आहे. या संस्थेला सरकारने अनुदान द्यावं आणि संस्थेतील बंद झालेले कोर्स पुन्हा चालू करावेत, यासाठी स्टुडंट हेल्पिंग हॅंडने आंदोलनाचा इशारा दिला आहे.


या संबंधी प्रसिद्ध केलेल्या पत्रात आंबेकर यांनी नमूद केले आहे की, राज्यात फुले,शाहु,आंबेडकराचे नाव घेउन वेळोवेळी सत्तेत येत आहात.त्याचा विचाराचे पाईक आहेत असे वारंवार सांगता.प्रत्यक्षात माञ त्यांच्या नावाची एतिहासिक स्वायंता संस्था निधी अभावी बंद पडण्याचा मार्गावर आहे.सध्या या ठिकाणी नेमकं काय चाललंय ते कळत नाहीये. कोरोनाच्या नावाखाली अनुदानाअभावी बरेच कोर्स बंद अवस्थेत आहेत. तसे पाहता बार्टी अंतर्गत एकूण 59 प्रकारचे योजना चालतात, यातील बहुतांश योजना सध्या अडचणीत आलेल्या आहेत.

संचालक बदलतात तशी त्यांच्या दृष्टिकोनानुसार बार्टीची धोरणेही बदलतात, असे निरीक्षण आहे. याची झळ आणि गैरसोय मात्र विद्यार्थी आणि संस्थांना बसत आहे.

बंद पडलेल्या योजना –

1) 15% मध्ये मिळणारे महामानवाचे दुर्मिळ ग्रंथ,संविधान प्रत असे विविध पुस्तकांचा उपक्रम करोनामुळे अनुदान नसल्याचे कारण देत बंद केला आहे.

2) बार्टी चा कणा म्हणुन ओळखी जाणारी ‘कौशल्य विकास योजना’ देखील निधी अभावी बंद आहे.

3)साविञीबाई फुले पुणे विदयापीठात ‘डॉ.आंबेडकर स्टडिज’ डिपार्टमेंट ला विविध कोर्सेस बार्टीच्या संयुक्त विद्यामानाने सुरू केले, त्यासाठीचा निधीही बंद केला आहे. अशावेळी हे कोर्सेस चालणार कसे ?

4) पुणे विद्यापीठातील पाली विभागाला बार्टीकडून मिळणाऱ्या अनुदानालाही कात्री लावली आहे. याठिकाणी चालणारे पाली ञिपीटीका मराठी भाषांतर बंद.

5) स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांचे मानधन 2019 पासून दिलेले नाही.

6) बार्टीत संविधानिक विचाराचा प्रसार-प्रचार करणारे 400 आसपास समतादुत आहेत. त्यांचे मानधन बंद.

7) जेईई, नीट, पोलीस भरती प्रशिक्षण अध्यापही सुरु नाही.

करोनाच्या नावाखाली अनुदान रोखून अशा महत्वापुर्ण योजना बंद पडत असतील किंवा त्या पाडायच्याच असतील तर बार्टी ही स्वायत्ता संस्था बंदच करा ना सरळ. उगीच असले बेगडे प्रेम आमच्यावर कशाला दाखवता…?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सगळीकडे अलबेल चाललं आहे, सगळ्या यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर येतायेत. मग बार्टीच्या अनुदाना विषयीच हाताला लकवा बसतोय की काय ? या खात्याचे मंञी धनजंय मुंडे त्यांचे बार्टीकडे लक्ष नाहीये.

बाबासाहेबांच्या नावाने एका स्वायत्त संस्थेला घरघर लागली आहे. अडचणी येतात – किंबहुना त्या हेतुपूर्वक वेळोवेळी आणल्या जातात. त्यामुळे याविषयी आपण मार्ग काढावा. राजकारण्यांच्या हजारो कोटीच्या शिक्षणसंस्था करोना असला तरी चालतात.बार्टीबाबत दुजभाव का?
मुळ ध्येय धोरणापासुन ही संस्था भरकटत चाललीय. या सगळ्याला वेळेतच वेसन घालण्याची गरज आहे. अन्यथा ही संस्था बंद पडायला वेळ लागणार नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading