Thursday, November 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई निर्भया प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना – पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची माहिती

मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार प्रकरणात आतापर्यंतच्या तपासात एकच आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे, तसेच या प्रकरणाचा तपास  सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम  करणार आहेत अशी माहिती  मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, आरोपी मोहन चौहान या नराधमाला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुननावली आहे. 

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले, “साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल केलं जाईल, या  प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) तयार करण्यात आलं आहे. तपास पूर्ण करुन एका महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू,

फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईतील साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

Leave a Reply