भारती विद्यापीठ आयएमइडीचे चार सहकार्य करार

पुणे : व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांना उद्योगजगताबद्दल थेट मार्गदर्शन मिळावे यासाठी भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमइडी)चे चार उद्योगजगत आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सहकार्य करार केले आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमइडी)चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती दिली.या करारांमध्ये डाँग वुई हे दक्षिण कोरियातील विद्यापीठ,पुणे मॅनॅजमेण्ट असोसिएशन,इंटर्नशाला,वेंकीज इंडिया यांच्याशी केलेल्या करारांचा समावेश आहे. याखेरीज लिनस विद्यापीठ (स्वीडन) शी केलेल्या करारांतर्गत सौम्या पांडे,कनक त्यागी हे दोन विद्यार्थी तेथे शिकावयास गेले आहेत.स्टुडंट,फॅकल्टी एक्स्चेंज,प्लेसमेंट,कार्यशाळा,जॉब सर्च,इंडस्ट्री व्हिजिट अशा अनेक बाबतीत या करारांचा फायदा होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: