राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरणार

पुणे: राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काही दिवस ओसरण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सरकला असून, राजस्थानच्या जैसलमेरपासून, उदयपूर, मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्रातून गोंदिया, भुवनेश्वर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) कायम आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, नाशिक जिल्ह्यात उद्या (ता. ९) तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा “यलो अलर्ट” देण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नवीन कमी दाब क्षेत्रामुळे रविवारपासून वाढणार पाऊस
बंगालच्या उपसागरात तयार झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेश परिसरावर असून, त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. उपसागरात शनिवारपर्यंत (ता.११) नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे रविवारपासून (ता.१२) पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. ७) धुव्वाधार पावसाने मराठवाड्याच्या बहुतांशी भागाला दणका दिला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे सर्वाधिक २८८ मिलीमीटर तर गुहागर येथे २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यात सकाळपासून असलेल्या ढगाळ हवामानानंतर अनेक ठिकाणी दुपारपासून पावसाला सुरूवात होत आहे. काही ठिकाणी रात्री उशीरापर्यंत जोरदार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे सरकले. त्याला दक्षिण महाराष्ट्रात हवेच्या वरच्या थरात असलेल्या परस्पर विरोधी वाऱ्यांच्या प्रणालीची पूरक साथ मिळाल्याने राज्यात पावसाने जोर धरला. कोकण, मराठवाड्याच्या अनेक भागात गेले तीन-चार दिवस सातत्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम होता.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. तर कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दाणादाण केली आहे. मराठवाड्यातील जळगाव, नंदूरबार, नाशिकसह कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला असून, काही ठिकाणी १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

बुधवारी (ता. ९) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये 

कोकण :
मुंबई शहर : सांताक्रुझ ७९,
पालघर : डहाणू ८३, जव्हार ६९, मोखेडा ५१, वाडा ६०.
रायगड : मुरूड १२४, पनवेल ७३, श्रीवर्धन १२२, उरण ६५.
रत्नागिरी : चिपळूण ७३, दापोली १५३, गुहागर २४०, हर्णे ७८, खेड ४२, लांजा ४८, राजापूर ८९, रत्नागिरी ५९, संगमेश्वर २८८.
सिंधुदुर्ग : दोडामार्ग ६१, कणकवली ४८, कुडाळ ५०, मालवण ६८, सावंतवाडी ७१,

Leave a Reply

%d bloggers like this: