‘लालबागच्या राजा’ची पहिली झलक, अमिताभ बच्चन यांनी शेयर केला व्हिडीओ

बिग बी अमिताभ बच्चन यांनी ‘लालबागच्या राजा’ची पहिली झलक दाखवणारा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करताना अमिताभ यांनी ‘ओम गण गणपतये नमः.. गणपती बाप्पा मोरया..पहला दर्शन, लालबागचा राजा’, असे लिहिले आहे. परंतु इतरां प्रमाणे बिग बींनी देखील इथे गफलत केली आहे. कारण हा व्हिडिओ यंदाचा नसून 2016 मधील म्हणजेच 5 वर्ष जुना आहे. गेल्या दोन दिवसांपासून हाच व्हिडीओ लालबागच्या राजाची 2021मधील गणेश मूर्तीची पहिली झलक म्हणून व्हायरल होत आहे. हाच व्हायरल व्हिडीओ अमिताभ बच्चन यांनी शेयर केला आहे.

दरम्यान, करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्य सरकारने प्रमुख गणेश मंडळाच्या गणारायांचे दर्शन ऑनलाईन घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यंदा लालबागच्या राजाचे दर्शनही ऑनलाईनच घेता येणार आहे. त्यामुळे लालबागच्या राजाची नेत्रदीपक मूर्ती आणि सजावट ‘व्हर्च्युअली’ पहावी लागणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: