मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अन्यायाबाबत विभागीय आयुक्त कार्यालयावर बहुजन लोक अभियानाचे उपोषण

  • दोषी प्राचार्यावर कारवाईची मागणी 

पुणे : दौंड तालुका कला,वाणिज्य महाविद्यालय दौंड या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलांची लाखो रुपये शिष्यवृत्ती चे वाटपच केले नाही .आदिवासी मुलांचे शिष्यवृत्तीचे अर्ज हे वरती पाठवण्या ऐवजी ते अर्ज परस्पर गायब केले आहेत.त्यामुळे अशा प्रचार्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी बहुजन लोक अभियान चे प्रदेशाध्यक्ष आबा वाघमारे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय समोर निदर्शने करून उपोषण करून या प्रकरणी न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

या बाबत दोषी वर कारवाई करावी म्हणून पुणे विद्यापीठात ही आंदोलन करण्यात आले होते .त्यांनतर शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ही आंदोलन केले परंतु कारवाई केली नाही व या बाबत न्याय न मिळाल्याने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करीत असल्याचे आबा वाघमारे यांनी सांगितले .या वेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त यांना देण्यात आले.तसेच या बाबत अजूनही महविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कामकाजाबाबत बऱ्याच तक्रारी असून त्याचीही चौकशी होऊन कारवाई करावी अन्यथा मुबई येथे मंत्रालया समोर आंदोलन करण्याचा इशारा आबा वाघमारे यांनी या वेळी दिला .

Leave a Reply

%d bloggers like this: