Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

या वर्षीच्या गणेशोत्सवात नदी प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प करू-गणेश कलापुरे

पुणे: शहरात दररोज साधारणपणे 750 दक्षलक्ष लिटर  मैलापाणी उत्पन्न होते .त्यातील फक्त 30 ते 40  पाण्यावर प्रक्रिया होते. म्हणजेच रोज जवळ जवळ 450 ते 525 दशलक्ष (45 ते52.5कोटी) लिटर मैला पाणी नदीमध्ये तसेच सोडले जाते.आणि या मूर्तीच आपण अशा पाण्यात विसर्जन करणार का की तिथे रोज 50 कोटी लिटर मानवी मलमूत्र असलेले मैला पाणी सोडले का जाते?नदी प्रदूषन मुक्तीसाठी वर्षभर रोज प्रयत्न करू असा संकल्प  या गणेशोत्सवास करू. असे आवाहन स्वच्छता चे कार्यकर्ते गणेश कलापुरे यांनी पत्रकार परिषदेत केले .

या पत्रकार परिषदेला  श्रीमंती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट चे राजेंद्र बलकवडे,रवींद्र पठारे उपस्थित होते.

कलापुरे म्हणाले, गणेशोत्सव कशासाठी? घरात सुख समृद्धी यावी यासाठी की केवळ मौजमजेसाठी? गणपती बाप्पाच्या भक्तीसाठी की डेकोरेशन सजवटी साठी समाज एकत्रीत येऊन विधायक कार्य करण्यासाठी की बेधुद बेभान होण्यासाठी मुलाबाळांवर सुसंस्कार करण्यासाठी की हुलडबाजी करण्यासाठी ?असे प्रश्न पर्यावरण नदी स्वच्छता चे कार्यक्रते गणेश कलापुरे यांनी उपस्थित केले.

घरात तुळशी  वृंदावन असावे, घरात प्लॅस्टिकचा वापर न करणे यावर भर द्यावा, शक्यतो कागदी कापडी पिशव्याचा वापर करावा, घरात / सोसायटीत ओला कचरा ,निमाल्य यांचे खत तयार करावे व त्याच्या घरातिल/सोसायटीतील झाडात वापर करावा. सण संभारभ प्लॅस्टिक मुक्त असावेत, असे आवाहन पर्यावरण नदी स्वच्छता चे कार्यक्रते गणेश कलापुरे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading