आंतरराष्ट्रीय समाजशास्त्रज्ञ गेल आँमवेट यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी

पुणे : अंतरराष्टीय समाजशास्ञज्ञ गेल आँमवेट यांच्या नावे साविञीबाई फुले विदयापीठ पुणे. मध्ये अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी  स्टुडंट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

या संदर्भात लिहिलेल्या पत्रात कुलदीप आंबेकर यांनी म्हटले आहे की, नुकतेच काही दिवसापुर्व गेल आँमवेट_पाटणकर यांचे निधन झाले. स्वातंञ चळवळीच्या लढयात ज्या प्रमाणे भारतात येउन अँनी बेझंट यांनी योगदान दिले.तसेच स्वातंञ्यानंतर गेल यांनी महाराष्टात येउन शब्दश;आयुष्य सामाजिक चळवळीत काम केले. हे काम गुणात्मक व संशोधनात्मक गोष्टीवर जास्त भर देउन त्यांनी केले.

येथे येउन त्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळवुन परिवर्तनवादी विचाराचा प्रसार आणी प्रचार अशा वेळी केला की ज्यावेळा प्रसारमाध्यामाचे,अधुनिक तंञज्ञानाचा वावर भारतात झालेला नव्हता.अशा वेळा मोठया नेटाने हे काम केले.अनेक कठीण परिस्थितीचा सामना त्यांनी केला.
मुळच्या अमेरिकेतील मीनीसोटा या ठिकाणच्या त्या रहिवासी होत्या. विदयार्थी ,डाव्या चळवळीच्या विचाराचे वारे जगभर वाहत होते.अशा वेळी त्या भारतात “सामाजिक सांस्कृतिक बंड _महाराष्टातील ब्राम्हणेत्तर चळवळीचा अभ्यास” करण्यासाठी आल्या होत्या.

यांचबरोबर त्यांचा विविध डाव्या,पुरोगामी,आंबेडकरी चळवळीशी निकटचा संबंध आला.यातुनच त्यांनी आपल्या विपुल वाचनातुन विविध ग्रंथसंपदा ही निर्माण केली.त्यामध्ये साँग्ज आँफ तुकोबा,बुध्दीझम इंडीया,वासाहतिक सामाजातील सांस्कृतीक बंड,दलिज व्हीजन,जेंडर टेक्नाँलाँजी आणी आंबेडकर टुवर्डस एनलायटन असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहले.

याचबरोबर इकाँनामिक्स अँण्ड पाँलिटिक्स विकली,सोशल सायंटीस्ट व मराठीतील परीवर्तनाचे वाटसरु या नियतकालिकातुनही विपुल लिखाण केले.

जगभरातील वेगवेगळया विदयापीठात त्यांनी सल्लागार म्हणुनही काम पाहीले होते.त्याचबरोबर श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यामातुन समान पाणी वाटप,दुष्काळ निर्मुलन आणी स्ञी चळवळ या उपक्रमात मोठे काम त्यांनी केले.

गेल यांच्या जिव्हाळयाचे विषय म्हणजे बुध्द,मार्क्स,संत तुकाराम,महात्मा फुले आणी डाँ.आंबेडकर. यांच्यावर त्यांनी सैध्दांधिक मांडणी केली.

तसेच साविञीबाई फुले विदयापीठाची त्यांचे घनिष्ठ नाते होते.त्या संशोधनाचे काम तिथे करत होत्या.अशा कार्यकतृत्वानी दिग्गज ,महान असणार्‍या गेल आँमवेट यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरु करावे.यामुळे विदयापीठाच्या नावलौकिकात अधिकच भर पडेल.

Leave a Reply

%d bloggers like this: