परभणी – पर्यावरणपूरक गणेशोत्सव : देशी गायीच्या शेणा पासून बनविल्या 310 गणेश मूर्ती 

परभणी : दरवर्षी गणेशोत्स प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची पूजा करून विसर्जनाने साजरा केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण वाढते आहे. याला आवर घालण्यासाठी झरी येथील पद्माकर अनंतराव चव्हाण कुटुंबीय मागील दोन वर्षांपासून देशी गायीच्या शेणा पासून गणेश मूर्ती तयार करीत आहेत. देशी गायीच्या शेणा पासून तयार केलेल्या गणेशमूर्तींचे प्रदर्शन शहरात आजपासून सुरू झाले आहे. गणेशभक्तांनी या प्रदर्शनाला भेट देऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्ह्यातील पर्यावरणरक्षक कार्यकर्त्यांनी केले आहे.

जून ते ऑगस्टदरम्यानच्या तीन महिन्यांच्या कालावधीत पद्माकर, वैशाली (पत्नी), उत्कर्षा (मुलगी),वेदांत (मुलगा) यांनी तब्बल तीनशे दहा गणेश मूर्ती घरच्या घरी तयार केल्या आहेत. ए. टी. डी. चे शिक्षण घेत असलेल्या झरी येथील विठ्ठल जगाडे, कुंभार काम करणारे प्रमोद यांचीही यासाठी साथ मिळाली .दररोज दोन ते तीन तासात चार- पाच गणेश मुर्त्या त्यांनी तयार केल्या आहेत.

गोसेवक असलेल्या पद्माकर चव्हाण यांच्याकडे लाल कंधारी या देशी चार गाई आहेत. त्यांच्या शेणापासून गणेश मुर्त्या त्यांनी तयार केल्या .6 ,9, 12 ,14 इंच उंचीच्या गणेश मुर्त्या बनविण्यासाठी किलोने गाईचे शेन लागते .ते त्यांनी जमा केले. शेणात  25% शाडू माती मिसळून मूर्तीच्या मजबुतीसाठी गवार बी वापरले .या सूत्राने पद्माकर यांनी पेन स्टँड ,लक्ष्मी मूर्ती, वॉलपीस ,दिवाळीसाठी लागणारे दिवे तयार केले आहेत. यापैकी सुमारे तीनशे दहा गणेशमूर्तींचे प्रदर्शन 7  ते 9  सप्टेंबर दरम्यान होटेल निरज इंटरनॅशनलच्या प्रदर्शन हॉलमध्ये सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

लायन्स क्लब परभणीचे अध्यक्ष  प्रदीप गोलेच्छा यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. यावेळी दिलीप जोगड, शैलेश मल्होत्रा, जुमालाल मुथ्था, नीरज पारख, सुनील मुथ्था, अॅड. राजेश भांबरे, प्रमोद सोनी, झरी येथील काष्टशिल्पकार नामदेव पंडित आदि उपस्थित होते. 

जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 2 सहकारी संस्था (पशु, दुग्ध, मत्स्य) परभणी कार्यालयातील उपलेखापरीक्षक असलेले पद्माकर चव्हाण यांच्या गायीच्या शेणापासून तयार केलेल्या मूर्ती गोवा, औरंगाबाद ,नागपूरपर्यंत पोहोचलेल्या आहेत. लायन्स क्लबच्या 70 सदस्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले असून चव्हाण यांच्याकडील 70 मूर्ती खरेदी केल्या आहेत.अशाच प्रकारे सर्वांनी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा,असे आवाहन पर्यावरण रक्षक कार्यकर्ते नंदकुमार महिंद्रकर, डॉ. देवानंद ओमनवार ,अमोल सातभाई, विजय आदमाने ,शंकर अजेगावकर ,एकनाथ पदमवार,  महेश सोनी, डॉ. रामानंद व्यवहारे ,डॉ. राजेश चौधरी ,नीरज चव्हाण, प्रसाद लोंढे ,परमेश्वर स्वामी ,माणिकराव रासवे,आतिश अग्रवाल ,आशिष लोया, पमु सोनी ,राम तुपे, दत्ता पहारे आदींनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: