Tokyo Paralympic 2020- 21 : IAS सुहास यथिराजला बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक
Tokyo Paralympic 2020- 21: टोकियोमध्ये पॅरालिम्पिकमध्ये आज शेवटच्या दिवशी सुहास यथिराजने बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या नंबरवर असलेल्या सुहासने आज बॅडमिंटन पुरुष एकेरीत SL4 प्रकारात हे पदक जिंकले. अंतिम सामन्यात फ्रान्सच्या के एल माजुरने त्याचा 21-15, 17-21, 15-21 असा पराभव केला. त्यामुळे सुहासला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सुहास हे आयएएस अधिकारी असून ते सध्या नोयडाचे डीएम म्हणून कार्यरत आहेत.
सुहास एल यथिराजने दिवसाची सुरुवात धमाकेदार करुन दिली. काल खेळलेल्या सेमीफायनल सामन्यात सुहासने डोनेशिया चे फ्रेडी सेतियावानला 31 मिनिटामध्ये सरळ सेटमध्ये 2-0 असे पराभूत केले होते. पहिला सेट 21-9 तर दुसरा सेट 21-15 असा जिंकत सुहासनं फायनल गाठली होती. मात्र फायनलमध्ये त्याला निराशा हाती लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सुहास यथिराजचे अभिनंदन केले आहे.
A fantastic confluence of service and sports! @dmgbnagar Suhas Yathiraj has captured the imagination of our entire nation thanks to his exceptional sporting performance. Congratulations to him on winning the Silver medal in Badminton. Best wishes to him for his future endeavours. pic.twitter.com/bFM9707VhZ
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2021
