महिलांनी स्वतः उद्योग व्यवसायात उतरले पाहिजे – कृषी अधिकारी एस.एस. सावंत

पुणे : वर्तमान युगात आर्थिकदृष्ट्या दुर्बल राहून चालणार नाही, प्रत्येकाने आपापल्या परीने आर्थिकदृष्ट्या सबलीकरणासाठी पाऊल उचलले पाहिजे. महिलांनी पुरुषांवर अवलंबून न राहता स्वतः उद्योग व्यवसायात उतरले पाहिजे तरच संसार आणि कुटुंबाची गाडी सुखाच्या दिशेने वाटचाल करेल. महिलांना घरघुती स्वरूपाचे अनेक व्यवसाय उपलब्ध आहे. योग्य प्रशिक्षण घेऊन त्यातून उत्तम उत्पन्न प्राप्त करता येते. व्यवसायीक मार्गदर्शन करतांना कृषी अधिकारी एस. एस सावंत यांनी शेकडो व्यवसााची माहिती त्यांचे बाजारपेठे संदर्भात मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवणे, महिलांना रोजगार, शिक्षण अशा प्रकारची कामे करण्यासाठी ‘मानव एकता विकास फाऊंडेशन’ महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सुनिता गायकवाड गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहेत. फाऊंडेशनच्या कामात हातभार लागावा यासाठी शनिवार रोजी मानव एकता विकास फाऊंडेशन वतीने पुणे जिल्ह्यातील कासुर्डी तालुका दौंड येथे विविध पदांवर नविन महिला पदाधिकार्यांची नेमणूक करण्यात आली व त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. सोबतच या वेळी श्रीयश एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष, कृषी अधिकारी एस.एस सावंत यांच्या वतीने महिलांना व्यवसायीक मार्गदर्शन देण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी मानव एकता विकास फाऊंडेशन अध्यक्षा सुनिता गायकवाड, कृषी अधिकारी व व्यावसायिक मार्गदर्शक एस.एस. सावंत सर, शिवसेना विधानसभा समन्वयक श्रुती नाझीरकर, राजलक्ष्मी फाऊंडेशन अध्यक्षा सुजाता चिंता, सचिव- सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शंकर तेलंगे, संध्या देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते राजन नायर, पोलिस पाटील अश्विनी सोनवणे, ज्योती भिसे, अरविंद गायकवाड, बापु ढोबंरे, गावचे उपसरपंच, माजी सरपंच व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष यांनी केले.

सुनिता गायकवाड म्हणाल्या, समाजातील कोणत्याही घटकांवर अन्याय, अत्याचार खपून घेतले जाणार नाही. जर अत्याचाराला कोणी बळी पडले असेल तर मानव एकता विकास फाऊंडेशन सर्व ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून पिडीतांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा विश्वास त्यांनी कार्यक्रमा प्रसंगी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: