वडीलकीच्या नात्याने सणासुदीच्या काळात वस्ती विभागातील मुलींसाठी नवीन कपडे शिवण्याचा उपक्रम – चंद्रकांत पाटील

पुणे : कोरोनाच्या संकटकाळात अनेक कुटुंब बेरोजगार झाले, लॉकडाउन मुळे उद्योग धंदे बंद पडल्याने अनेकांची आर्थिक ओढाताण झाली. त्यात्या वेळी गरजूना शक्य ती मदत पुरविण्याचा प्रयत्न केला, मात्र या दरम्यान असे लक्षात आले की ह्या संकटकाळात वस्ती विभागातील अनेक कुटुंबातील लेकींना नवीन कपडे सुद्धा शिवले गेले नाहीत आणि मग मनाशी निर्धार केला की सणासुदीच्या काळात ह्या सावित्रीच्या लेकींना उत्तम दर्जाचे कपडे भेट द्यायचे आणि त्या कडीतीलच हा कार्यक्रम होतो आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.यापुढील काळात शाळा सुरु झाल्यावर मुलींनी मला पत्र पाठवून त्यांना ज्या साहित्याची गरज आहे ते मला लिहून कळवावे, जे जे कमी असेल ते ते देण्याचा मी प्रयत्न करेन असेही पाटील यांनी घोषित केले.

पतित पावन संघटनेच्या माध्यमातून कोथरूड च्या जय भवानी नगर येथे मुलींना शिलाई सह मोफत ड्रेस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी
मंजुश्री खर्डेकर. शिक्षण समिती अध्यक्ष, नगरसेविका. छाया मारणे स्थानिक नगरसेविका. नगरसेविका वासंती जाधव, संदीप खर्डेकर, दीपक पोटे, डॉ. संदीप बुटाला, पुनीत जोशी, सुनील मराठे हर्षदा फरांदे अध्यक्ष, श्रीकांत शिळमकर
संतोष रायरीकर, संतोष अमराळे स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, अनिता तलाठी, सरचिटणीस सुरेखा जाधव, कल्याणी खर्डेकर,अभिजित राऊत
आदी उपस्थित होते.

वडीलकीच्या नात्याने आणि पालक म्हणून या मुलींना नवीन कपडे शिवतानाच ह्या ड्रेस च्या शिलाईचे काम करून महिलांना आपल्या कुटुंबाचा आधार होता यावे यासाठी येथील *बचत गटाच्या महिलांना 10 शिलाई मशीन भेट दिल्या असून शिलाईचे काम ही त्यांनाच देत असल्याचे *आ. चंद्रकांतदादा पाटील* म्हणाले. टप्प्याटप्प्याने संपूर्ण कोथरूड मधील गरजू मुलींना नवीन कपडे शिवणार असल्याचे ही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संयोजन सुनील मराठे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: