Tokyo Paralympic 2020- 21 : कृष्णा नगरची सुवर्ण पदकाला गवसणी, सुवर्ण पालकांना समर्पित  

टोकियो : कृष्णा नगरने पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरी एसएच 6 स्पर्धेच्या अंतिम फेरीत हाँगकाँगच्या चू मान काईला हरवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. कृष्णाने हे पदक आपल्या आई – वडिलांना समर्पित केले आहे. टोकियो पॅरालिम्पिक बॅडमिंटनमध्ये भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. तर भारताचे हे पाचवे सुवर्णपदक आहे. दरम्यान, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कृष्णा नगर आधी प्रमोद भगतने बॅडमिंटनमध्ये शनिवारी सुवर्णपदक जिंकले आहे.

22 वर्षीय कृष्णाने शांत आणि संयम राखत एकूण 43 मिनिटे चाललेल्या अंतिम फेरीत 21-17, 16-21, 21-17 असा विजय मिळवला. विजयानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी माझे पदक माझ्या वडिलांना आणि आईला समर्पित करतो. आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि मी याबद्दल खूप आनंदी आहे. मी दडपणाखाली खेळत होतो. पण जेव्हा मी माझा खेळ बदलण्यास सुरुवात केली, तेव्हा सकारात्मकता परत आली. त्यानंतर माझा खेळ थोडा बदलला आणि मला आघाडी मिळाली. शेवटच्या क्षणी खेळ माझ्या हातात होता,”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून कृष्णाला शुभेच्छा दिल्या आहेत.

 		

Leave a Reply

%d bloggers like this: