माहिती तंत्रज्ञानाद्वारे जागतिक पातळीवरील ज्ञानाशी नाळ जोडली जाते – शरद पवार 

पुणेः- बदलत्या जगाच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान आणि ई-लर्निंग स्कूल सारखे पर्याय निवडले पाहिजे. या पर्यायांच्या माध्यमातून आपणास विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तसेच या माध्यमातून जागतिक पातळीवरील ज्ञानाशी आपली नाळ जोडली जाते, असे मत देशाचे मा.कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने यांच्या विकासनिधीतून कोथरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या संकल्पनेतून सर्वे नंबर 9 वेदांत नगरी जवळ 900 फुटी डी.पी.रोड कर्वेनगर येथे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कूल उभारण्यात आले असून या ई-लर्निंग स्कूलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, स्वप्नील दुधाने, खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,  म.न.पा आयुक्त विक्रम कुमार, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर, अंकुश काकडे, मनपा विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, रवींद्र माळवदकर,  शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, दिपक मानकर, दिलीप बराटे,  आमदार सुनील टिंगरे,  बाबुराव चांदरे,  सचिन दोडके, मुख्य अधिकारी मीनाक्षी राऊत, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, पालिकेच्या माध्यमातून विकास काम केली जात असतांंना सर्वसाधारणपणे नगरसेवक त्यांच्याच घरातील कोणाचे तरी नाव देतो, पंरतू आज उद्घाटन होत असलेल्या ई-लर्नींग स्कुलच्या इमारतीस  लक्ष्मी दुधाने यांनी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम असे नामकरण करून नवीन आदर्श निर्माण केला आहे. माझा कलाम यांच्याशी घनिष्ठ संबंध होता. अतिशय साधी राहणी, कसलेही व्यसन नाही आणि कायंम राष्ट्रच्या प्रगतीचा ध्यास असे कलाम हे व्यक्तिमत्व होते. त्यांनी विकसित केलेल्या अनेक क्षेपणास्त्रांना त्यांनी भारतीयांची अस्मीता जपली जाईल असेच
त्या क्षेपणास्त्रांचे नामकरण केले. प्रयोग यशस्वी झाल्यास त्यांचा आनंद चेह-यावरुन ओसांडून वाहत असे आणि  कधी चुकून एखादा प्रयोग अयशस्वी झाल्यास डोळ्यातून घळाघळा अश्रु ओघळताना मी पाहिले आहे. ते अश्रु पुसून त्यांनी वैज्ञानिकांना देखील सातत्याने प्रेरित करण्याचे काम केले. शास्त्रीय संगीताची आराधना करणारे कलाम यांनी आधुनिकता, विज्ञान आणि चारित्र्य यास कायंम प्राधान्य दिले. आणि आज त्यांच्याच नावाने सुरु होणा-या या शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांमध्ये आपोआपोच हे तीन गुण पाझरतील.

Leave a Reply

%d bloggers like this: