पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 199 नवीन कोरोनाचे रुग्ण
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी असून आज शंबरच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 199नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 391रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 96हजार 543 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 85हजार 287इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 10रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 5तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 5रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8945जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 2317रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 297रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 10094 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
