सरकारने सर्वत्र मुर्खा सारखे नियम लावले आहेत – राज ठाकरे
पुणे: वक्तृत्व स्पर्धेमागचा उद्देश हा वक्ते घडविणे हा असतो. बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलण्याची संधी दिली त्यामुळेच मी एक चांगला वक्ता झालो आहे, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच सरकारचे काही कळत नाही, सरकारच्या मनात आले की लॉक डाउन लागतं अन् त्यांच्या मनात आल की लॉकडाउन उठवला जातो. इतर ठिकानां प्रमाणे आजच्या कार्यक्रमाला देखील सरकारने मुर्खा सारखे नियम लावले आहेत, असे म्हणत ठाकरे सरकारला टोला लगावला.
शिवशाहीर करंडक महाअंतिम फेरी आज सृष्टी गार्डन डी पी रोड म्हात्रे पुलाजवळ येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी त्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या सुरूवातीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे,नगरसेविका रुपाली ठोंबरे वपुणे शहर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने यावेळी शिवशाहीर करंडक विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. छोट्या गटात प्रथम क्रमांक प्रथमेश चव्हाण याचा सत्कार करण्यात आला. मोठ्या गटात उत्तेजनार्थ मेघा पाटील ,तिसरा क्रमांक इम्रान शेख, द्वितीय क्रमांक आनंद क्षीरसागर तर प्रथम क्रमांक प्रसाद मोरे यांचा देखील राज ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
