रिया मोहन मिस युनिवर्स 2021 ची विजेती 

पिंपरी ; मिस महाराष्ट्र -2019 आणि मिस इंडिया -2021 प्रथम उपविजेतेपदानंतर रिया मोहन हिने मिस युनिव्हर्स -2021 विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  या स्पर्धेत आसाम, हिमाचल प्रदेश, बिहार, हरियाणा आदींसह अन्य राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. जोईल एंटरप्राइजेसचे मिस्टर सँडी जोइल यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते.
आपल्या या यशाबद्दल रिया मोहन म्हणाली, की मेहनत, सहनशक्ती आणि सातत्य यामुळेच ही महत्त्वाची भूमिका बजावता आली. माझ्या यशाद्वारे इतरांना नवनिर्मिती करण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची आणि प्रेरणा देण्याची इच्छा आहे. कलेच्या माध्यमातून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि मी इच्छिते तसे व्हावे म्हणून मी माझे सर्वस्व पणाला लावत असते. योग्य दृष्टीकोन आणि आत्मविश्वास हीच माझ्या विजयाची गुरुकिल्ली आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांहून वेगळे करून दाखविण्यासाठी अतूट आत्मविश्वास बाळगला पाहिजे. परंतु नम्र असणे देखील तितकेच आवश्यक आहे. या विजयानंतर मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन ठेपली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: