आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांची मानसिकता तालिबान सारखीच – जावेद अख्तर

मुंबई – ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबान्यांसोबत केली आहे. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचे म्हणत आरएसएसला समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मचिंतन करायला पाहिजे, असे परखड मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी जावेद अख्तर यांनी एनडीटीव्हीला एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये ते म्हणाले होते की, ‘आरएसएस, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल सारख्या संघटनेच्या उद्देश तोच आहे, जो तालिबानचा आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांचा एका वर्गावर टीका करत जावेद अख्तर म्हणाले की, ‘जगभरात उजवा गट आहे.’ भारतीत अल्पसंख्यांकांवरील मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर प्रकाश टाकत ते पुढे म्हणाले की, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण रिहर्सल आहे. ते तालिबान्यांची प्रवृत्ती अवलंब करत आहेत. ते एकच लोकं आहेत, फक्त नावं वेगळी आहेत. त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामधे भारतीय संविधान येत आहे. परंतु जर त्यांना संधी मिळाली तर ते सीमा ओलांडतील.’

‘जे लोकं आरएसएस, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल सारख्या संघटनेचे समर्थन करतात, त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकतेच आहे, यात काही शंका नाही, ते रानटी आहेत. पण तुम्ही ज्यांना समर्थन देत असलेल्यांपेक्षात ते वेगळे कुठे आहेत? त्यांची जमीन मजबूत होत असून ते त्यांच्या लक्ष्यकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता एकच आहे,’ असे जावेद अख्तर म्हणाले.

‘तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर भारतीय मुस्लिमांचा एका गट आनंद व्यक्त करत आहे. भारतातील मुस्लिम तरुण चांगलं जीवन, रोजगार, चांगलं शिक्षण या गोष्टींच्या मागे लागले आहे. मात्र मुस्लिमांचा असा एक लहानसा गट आहे, जो स्त्री-पुरुष असा भेदभाव करत असून समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भारतातील बहुतांश लोकसंख्या धर्मनिरपेक्ष असून ते एकमेकांचा आदर करतात. यामुळे तालिबानी विचार त्यांना आकर्षित करू शकत नाहीत. म्हणूनच भारत आताही आणि भविष्यातही कधीच तालिबानी बनू शकत नाही,’ असा विश्वास अख्तर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

%d bloggers like this: