प्रा.निरज टोपरे यांना एक्सलन्स पुरस्कार

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (डब्ल्यूपीयू) स्कूल ऑफ केमिकल इंजिनिअरिंगचे प्रा. निरज एस. टोपरे यांना ‘आचार्य प्रफुल्ल चंद्र रे अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ या पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले.
भारतीय रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्ल चंद्र रे यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त कोलकत्ता येथे इंडियन केमिकल सोसायटी, कोलकत्ता द्वारा आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक परिषदेत प्रा. निरज टोपरे यांनी ‘रेसेन्ट अडवान्सेइन इन केमिस्टी अँड मटेरिअल साइन्सेस’ या अल्ट्रासाऊंड सहाय्यक शोषण प्रक्रियेच्या विकासाठी पध्दतशीर दृष्टिकोन हा पेपर सादर केला होता. या पेपरचे को ऑथोर डॉ. सुनीता राऊत-जाधव, डॉ. शांतीनी ए. बोकील या आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठित वैज्ञानिक व्यासपीठावर या नवीन दृष्टिकोनाचे कौतुक झाले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: