स्केचर्स इंडिया तर्फे बहुगुणी स्केचर्स गोरन रेझर एक्सेस सादर

पुणे : द कम्फर्ट टेक्नॉलॉजी कंपनी’ अशी ओळख असलेल्या ‘स्केचर्स’ने ‘गोरन रेझर एक्सेस’ ही धावण्यासाठीच्या बुटांची नवीन श्रेणी खास पुरुषांसाठी सादर केली आहे. ‘गोरन रेझर ३’ या लोकप्रिय ठरलेल्या श्रेणीच्या आधारावर ही नवीन श्रेणी बाजारात आणण्यात आली आहे. खास प्रशिक्षक व धावपटूंना धावण्याचा उत्तम अनुभव देण्याच्या दृष्टीने हे शूज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले असून आरामदायीपणा, जमिनीवर उत्तम पकड आणि टिकाऊपणा ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.

धावणे या क्रीडाप्रकाराची लोकप्रियता भारतात वाढत असून तो अधिकाधिक विकसीत होत आहे. या दृष्टीने ‘स्केचर्स इंडिया’ने उच्च कार्यक्षमतेचे तंत्रज्ञान आणि आपल्या ट्रेडमार्कचे आरामदायीपणाचे वैशिष्ट्य या दोन्ही गोष्टींचा संयोग साधून मोठे अंतर धावणाऱ्यांना एक अनोखी भेट दिली आहे.पावलांना आराम देणारे, अगदी हलक्या वजनाचे आणि दीर्घकाळ टिकणारे ‘हायपर बर्स्ट-कुशन’; तसेच जमिनीवर उत्तम पकड, स्थिरता व टिकाऊपणा ही वैशिष्ट्ये असलेले गुडइयर रबर तंत्रज्ञान’ यांमुळे प्रत्येक प्रकारच्या धावपटूसाठी डिझाइन केलेले ‘स्केचर्स गोरन रेझर एक्सेस’ हे शूज जलद व आरामात धावण्यासाठी योग्य ठरतात.

या बुटांच्या पुढील अंतर्गत भागात पायाच्या बोटांसाठी खास आधार निर्माण करण्यात आला आहे, तसेच यातील ‘स्केचर्स हायपर एआरसी रॉकर बॉटम’ डिझाइन प्रत्येक पावलागणिक अधिकाधिक कार्यक्षमता देते. याच्या पातळ व स्ट्रेचेबल लेसेस धावत असताना आकुंचन व प्रसरण पावतात, त्यामुळे हे बूट पायात अगदी फिट बसतात. अशी उच्च कार्यक्षमता असलेले हे बूट दिसायलाही आकर्षक आहेत. रात्रीच्या वेळेस धावताना दृश्यमानतेसाठी ‘रेझर एक्सेस’वर ‘निऑन ग्राफिक प्रिंट्स’ व ‘रिफ्लेक्टिव्ह डिटेल्स’ यांचे डिझाइन देण्यात आले आहे.

स्केचर्स साऊथ एशिया प्रा. लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल वीरा म्हणाले की भारत ही उत्साही धावपटूंसाठीची एक मोठी बाजारपेठ आहे. चालणे किंवा धावणे, या दोन्हींसाठी आमच्या उत्पादनांद्वारे सर्वात आरामदायक अनुभव देण्यावर ‘स्केचर्स’चा भर असतो. जास्त अंतर धावू पाहणाऱ्या आणि धावण्याची गती व बुटांची पकड यांसाठी कोणतीही तडजोड न करणाऱ्या ग्राहकांना उत्कृष्ट उत्पादन देण्याच्या हेतूने आम्ही ‘स्केचर्स गोरन रेझर एक्सेस’ सादर केले आहेत. धावण्याचा सर्वोत्कृष्ट अनुभव मिळण्यासाठी तंत्रज्ञानाची प्रत्येक बाजू आम्ही या नवीन कलेक्शनमध्ये सांभाळली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: