बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन

मुंबई : ‘बिग बॉस सीझन १३’चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे सिद्धार्थने वयाच्या ४०व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात सिद्धार्थ शुक्लाचे सध्या पार्थिव असून पोस्टमॉर्टम तिथेच केले जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला रात्री गोळ्या घेऊन झोपला होता. परंतु औषध कोणते घेतले होते, याबाबतची माहिती मिळालेली नाही आहे. दरम्यान डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याचे जाहीर केले आहे. 

सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने हिंदी टेलिव्हिजनला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ शहनाज गिल सोबत ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसला होता. सिद्धार्थने २००८ साली ‘बाबुल का आंगन छूटे ना’पासून करिअरला सुरुवात केली होती. ज्यानंतर तो ‘जाने पहचाने से अजनबी’, ‘सीआईडी’, ‘बालिका वधू’ आणि ‘लव यू जिंदगी’ आदी मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. तसेच त्याने ‘हम्टी  शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.  

Leave a Reply

%d bloggers like this: